नागपुरात स्वाईन फ्लूचं थैमान, बळींचा आकडा 22
जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूरमध्ये स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. स्वाईन फ्लूमुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन मृत्यूंमुळे नागपूरमधील स्वाईन फ्लूच्या बळींचा आकडा 22वर पोहोचला आहे.
एरव्ही वाढत्या तापमानात स्वाईन फ्लूचा प्रभाव हा कमी होत जातो. यंदा मात्र एवढ्या उकाड्यातही स्वाईन फ्लूचा कहर सुरूच असल्याने नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.