Sun. Nov 29th, 2020

तरूणीवर लाईन मारली म्हणून आला राग, रागाच्या भरात केला तलवारीने वार

राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरम्यान पिंपरीमधील शुल्लक कारणांवरून एका तरूणावर तलवारीने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दिवसाढवळ्या नंग्या तलवारी नाचवत हॉटेलमध्ये घुसून दोघांवर वार करण्यात आले आहेत. ही घटना पाहून पिंपरी चिंचवडचं बिहार होऊ लागलंय का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

आकुर्डीतील एका महाविद्यालयाच्या बाहेर तरुणींवर लाईन मारण्यावरून झालेला वाद याला कारणीभूत ठरला. गेल्या 26 फेब्रुवारीच्या या वादाचे पडसाद काल देहूरोडमध्ये उमटले.

तिघे मिसळ खायला बसलेले असताना चौघे थेट हॉटेलमध्ये घुसले. हातात नंग्या तलवारी असल्याचं ही सीसीटीव्हीत दिसत आहे. एकाने दोघांना खुर्च्यांसह बाहेर खेचलं. तर दुसऱ्याने तलवारीने वार सुरू केले.

मुंबई-बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेसमोर हा राडा सुरू होता. एका तरुणाने सुटका करण्यासाठी स्वतःचा शर्ट काढला आणि बचावासाठी धावला. पण ज्याच्या हातात तलवार होती तो त्याच्या मागे धावला. तेंव्हा इतर तिघे दुसऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते.

हा प्रकार पाहणाऱ्यांपैकी एकही त्यांच्या मदतीला धावला नाही. या घटनेत एकाच्या हाताचा बोट तुटले, तर दुसऱ्याला मुका मार लागला आहे.

देहूरोड पोलिसांनी याप्रकरणी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *