Tue. May 21st, 2019

#MeToo: टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप

0Shares

टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्यावर त्यांच्या महिला सहकाऱ्याने हा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र भूषण कुमार यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

भूषण कुमार यांनी नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्या सहकारी महिला कर्मचाऱ्यानं केला आहे. या प्रकरणी या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र या प्रकरणात अजून पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका महिलेने भूषण कुमार यांनी सिनेमात काम देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. ‘मी सिनेसृष्टीत नवीन होते. त्यावेळी मी खूप घाबरले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सिनेमातून काढून टाकण्यात आल्याची माहिती समजली,’ असे पीडित महिलेने म्हटले होते. तसेच भूषण कुमार यांनी करिअर उद्ध्वस्त करुन टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला होता. मात्र भूषण कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *