Sun. Aug 18th, 2019

टी 20 विश्वचषक: विजयाच्या हॅटट्रिकसह भारताची उपांत्य फेरीत धडक

0Shares

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ५२ धावांनी विजय मिळवला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 145 धावा केल्या होता. त्यामध्ये मिथाली राजने 56 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर स्मृती मंथानानेही 29 चेंडूत 33 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताला 145 धावांचा पल्ला गाठता आला. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौरने केवळ 7 धावा काढल्या. आयर्लंडकडून किम गर्थने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

अनुभवी मिताली राजने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आयर्लंडपुढे १४६ धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ केवळ ९३ धावाचं करू शकला.

नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून अनुभवी सलामीवीर मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी ६७ धावांची सलामी दिली. भारतीय महिला टीम विजयाच्या हॅटट्रिकसह उपांत्य फेरी गाठली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *