Mon. Jan 17th, 2022

‘आमचा जीव वाचवा’, आधी थुंकणाऱ्या ‘त्या’ रुग्णांची आता डॉक्टरांना विनंती

देशामध्ये लॉकडाऊन असूनही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतेय. कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीला डॉक्टरांना कोणतंही सहकार्य न करणाऱ्या तबलिगींना आता मात्र आपल्या जीवाची भीती वाटू लागली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आयसोलशन वॉर्डमध्ये असणाऱ्या तीन तबलिगींनी डॉक्टरांना उपचाराच्यावेळी कोणतंही सहकार्य केलं नसल्याचं समोर आलं. त्यांच्या अत्यंत संतापजनक वागण्याच्या बातम्या येत होत्या. डॉक्टरांच्या अंगावर थुंकण्याचा किळसवाणा प्रकारदेखील त्यांनी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आता हेच लोक डॉक्टरांकडे आपला जीव वाचावा म्हणून विनंती करत आहेत. कारण या लोकांची प्रकृती आता बिघडू लागली आहे. त्यामुळे ते आता घाबरून गेले आहेत. यासंदर्भात सीएमओ अशोक शुक्ला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “पूर्वी हे लोक डॉक्टरांना सहकार्य करत नव्हते. मात्र आता ते डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करत आहेत. जास्त भीती वाटायला लागल्यावर त्यांनी सहकार्य करायला सुरुवात केली आहे.”  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *