Sat. Jun 6th, 2020

Rain

मुंबई तुंबली नाही, थांबली नाही, पालिका उपायुक्तांचा अजब दावा

एकीकडे मुंबईची झालेली ही अवस्था आणि दुसरीकडे मुंबई तुंबली नाही, थांबली नाही असा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे.

पाणी साचल्यामुळे मुंबईकरांनी हे रस्ते टाळावे..

मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. यामुळे मुंबईकरांना काही रस्त्यावर प्रवास करण टाळलं पाहीजे.

मुंबई मंदावली, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर वाहतूक उशिराने

तीन दिवसापासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला आहे. पावसामुळे पश्चिम,मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई-पुणे लोहमार्गावर पुन्हा एकदा रेल्वे घसरली, वाहतूकीवर परिणाम

मुंबई-पुणे लोहमार्गावर पुन्हा एकदा रेल्वे घसरली. सुदैवाने यावेळी ही मालगाडी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दोन डबे पलटी झालेत, काही डबे डाऊन आणि मिडल लाईनवर आडवे होते तर काही डबे मागे सोडून मालगाडी पुढे गेली होती. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळच ही आणि ते ही डाऊन लाईनवरच ही पहाटे 4:30 च्या सुमारास घडलेली आहे.

खेडमध्ये जगबु़डी पुलाचा रस्ता शुभारंभापूर्वीच खचला, नागरिकांनी अधिकाऱ्यांनाच पुलाशी बांधले

मुसळधार पावसामुळे शनिवारी रत्नागिरीतील खेडच्या जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोड रस्ता खचला आहे. जुना पुल खराब झाल्याने हा नवा पुल लवकरच खुला करण्यात येणार होता.   

KDMC च्या बस चालकाने चक्क छत्री धरून चालवली बस

केडीएमसीच्या एका गळक्या बसमध्ये चालक चक्क छत्री धरून बस चालवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे, तर प्रवाशांच्याही डोक्यावर धारा लागल्यानं त्यांनाही बसमध्येच छत्र्या उघडून बसावं लागलं.

मुसळधार! दोन दिवसात इतक्या पावसाची नोंद

दोन दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत तर गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची सुरूवात झाली. अनेक भागात 24 तासातचं सारा परिसर जलमय झाला आहे.

दोन दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधील पातळीत वाढ

दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे यामध्ये  मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधील पातळीत वाढ झाली आहे. कालच्या मुसळधार पावसानं तलावक्षेत्रातील जलसाठा 5.31 हजार दश लक्ष इतका झाला.

अंबरनाथ पूर्व विभागात झाड पडून एका रिक्षाचालकाला मृत्यू

पावसामुळे अंबरनाथ पूर्व विभागात मुख्य रिक्षा स्टँडच्या जवळ असलेले एक झाड स्टँडच्या कार्यालयावर पडले आहे. या कार्यालयाच्या बाहेर  रिक्षाचालक बसले होते. त्यातील एका रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

पूल वाहून गेल्याने नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पासून 15 किलोमीटर अंतरावर कोसदनी घाटात जास्त पावसामुळे नाल्यावरील पूल वाहून गेला आणि सकाळपासून नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.

प्रतीक्षा संपली! मुंबईत जोरदार पावसाची जोरदार हजेरी

आज आणि उद्या दोन दिवस मुंबईत मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली होती. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.