नुसरत जहाँच्या मंगळसूत्र, सिंदूरवरून फतवा, नुसरत जहाँ यांचं प्रत्युत्तर!
नवनिर्वाचित तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी हिंदू व्यक्तीशी लग्न केल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र व कपाळावर सिंदूर लावून संसदेत हजर होत असल्याने यांच्याविरोधात दारुल उलूम देवबंदनं या संघटनेने फतवा जारी केल्याचं वृत्त होतं. या फतव्यावर ‘मला माझा धर्म माहीत आहे. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे,’असे प्रत्युत्तर नुसरत जहाँ यांनी दिल आहे.