Sat. May 25th, 2019

घोड्यावर बसले लाडोबा!

0Shares

अभिनेत्री करिना आणि सैफ अली खान यांचा ‘छोटा नवाब’ तैमूर हा लहान वयातच स्टार बनला आहे. त्याच्या प्रत्येक हलचालीवर लोक फिदा आहेत. रविवारी छोटे नवाब तैमुरने घोडेस्वारी केली. त्याची ही रॉयल  रायडिंगही चर्चेचा विषय ठरली. तपकिरी रंगाच्या घोड्यावर काळा टिशर्ट घातलेला गोरा गोबरा तैमुर पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहाणार नाहीत.

तैमुरच्या या खास टिशर्टवर वाघाची प्रतिमा आहे आणि टी-शर्टच्या मागे सोनेरी रंगात ‘तैमूर’ हे नाव कोरलंय. ज्या वयात इतर मुलं खेळण्यातल्या घोड्यावर बसून ‘खबडक खबडक घोडोबा’ करतात, त्या वयात छोटे नवाब मात्र खऱ्या खुऱ्या अबलख घोड्यावर बसून रपेट मारतोय. विशेष म्हणजे तैमुर घोड्यावर बसताना घाबरलेला दिसत नाहीय. तो अगदी शाही रूबाबात घोड्यावर बसलाय. त्याची रपेट व्यवस्थित व्हावी यासाठी आसपास त्याचा सांभाळ करणारी माणसंदेखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *