Fri. Apr 16th, 2021

‘त्या’ वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा सिंहने मागितली माफी

भोपाळच्या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे होतं.मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझा दोष नसताना हेमंत करकरे यांनी मला तुरूंगात ठेवले. हा देशद्रोह होता, धर्मद्रोह आहे आणि तुमचा सर्वनाश होईल असा शाप मी दिला होता.ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले त्यादिवशी मी तुरूंगात असल्यापासूनचे माझं सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं होत.

त्यांच्या या वक्तव्यावर  त्यांच्यावर चौफेर टीका झाली. आयपीएस असोशिएशनने साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.यावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली आहे.मी माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते.असं म्हणत त्यांनी माफी मागीतली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांचा माफीनामा

साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे होतं.

यानंतर  आयपीएस असोशिएशनने साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.

त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहे.

माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंचा फायदा होत आहे. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते.

ते माझे वैयक्तिक दु:ख होते असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञासिंह ?

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझा दोष नसताना हेमंत करकरे यांनी मला तुरूंगात ठेवले.

हा देशद्रोह आहे, धर्मद्रोह आहे आणि तुमचा सर्वनाश होईल असा शाप मी  हेमंत करकरे यांना दिला होता.

मी  करकरेंना दिलेल्या शापामुळं त्यांना 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मारलं.

ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले त्यादिवशी मी तुरूंगात असल्यापासूनचे माझं सुतक संपले.

ज्या पद्धतीनं कंसाला मारुन श्रीकृष्णानं समाजाला वाचवलं तसाच मृत्यू हेमंत करकरेंना आला.

शहीद हेमंत करकरे यांच्यावर असं वक्तव्य केल्याने सर्वचं स्तरातून त्यांचा निषेध झाला.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *