Mon. Dec 6th, 2021

‘आर्थिक लाभ घ्या, पण संप मिटवा’ – अनिल परब

   एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र अनिल परबांची ही बैठकसुद्धा निष्फळ ठरली आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देऊन संप मिटवण्याचे आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

   परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ घ्या, परंतु संप मिटवा असे आवाहन केले आहे. तसेच न्यायालयाच्या भूमिकेशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची मागणी पूर्ण करता येणार नाही, असे अनिल परब यांनी सांगितले आहे. त्यासाठी अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभाची ऑफर केली आहे. आर्थिक लाभ घ्या परंतु संप मागे घ्या, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे मविआ सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन अधिकच चिघळत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांची बैठक घेतली. मात्र परिवहन मंत्र्याची ही बैठकसुद्धा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे बुधवारीपुन्हा अनिल परब आणि संपकारी नेते यांच्यात बैठक पार पडणार आहे. आर्थिक लाभाबाबत कर्मचाऱ्यांची भूमिका जाणून घेऊन पुढील चर्चा करणार असल्याची भूमिका संपकारी नेत्यांनी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *