Sun. Sep 19th, 2021

खासदारकी घ्या; मात्र दिल्लीतील गाडी आणि बंगला द्या – उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवत सातारा जिल्ह्यात माजी राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवली. मात्र भाजपात प्रवेश करत असल्यामुळे उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यामुळे साताऱ्यातील जागा रिक्त झाली असून विधानसभासोबतच पोटनिवडणूक घेणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी पक्षातून शरद पवार उभे राहीले तर मी माघार घ्यायला तयार असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले.

नेमकं काय घडलं ?

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्याची जागा रिक्त झाली आहे.
त्यामुळे २१ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.
लोकसभेच्या जागेवर जर राष्ट्रवादीमधून शरद पवारांनी निवडणूक लढवली तर मी माघार घ्यायला तयार असल्याचे उदयनराजे म्हणाले.
माझ्या वडिलांनंतर शरद पवारांनीच मला प्रेम दिलं असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले.
साताऱ्यातील खासदारकी तुम्ही घ्या मात्र मला दिल्लीतील घर आणि गाडी द्या असे उदयनराजे म्हणाले आहे.
उदयनराजे भोसले भावूक झाले असून शरद पवारांवर प्रेम असल्याचे उदयनराजे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *