Tue. Sep 28th, 2021

…म्हणून हिंगोलीतील ताकतोडा गावच्या ग्रामस्थांनी चक्क गावाच काढले विक्रीला

सलग चार वर्षापासून चा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारीपणा अशा संकटात सापडलेल्या हिंगोली सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सलग चार वर्षापासून चा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारीपणा अशा संकटात सापडलेल्या हिंगोली सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्रित येत चक्क गावाच विक्रीला काढले आहे. व सरकारकडे इच्छा मरणाची परवानगी गावकऱ्यांनी मागितल्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सेनगाव तालुक्यातील 3000 हजार लोकसंख्या वस्ती असलेले ताकतोडा गाव आहे. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे.

या गावातील शेती कोरडवाहू असून सततचा दुष्काळ त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. गेली चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही.

सोयाबीन या पीकावर वर्षभराची गरज अवलंबून मात्र यंदाही जुलै महिना संपत आला तरी पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.

पाण्याअभावी पेरणी केलेली पिके सध्या करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. बँकांच्या आडमुठ्या धोरणामुळे पीककर्जापासून शेतकरी वंचित राहिले आहेत.

त्यामुळे त्यांनी खासगी बँकांचे सावकाराचे कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत. सलग तीन ते चार वर्षापासून पीक संरक्षण विमा देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेवटचा यामध्ये मार्ग काढून गावकऱ्यांनी एकत्र येत शकता ताकतोडा विक्रीला काढले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *