तहसील टीम पेट्रोलींगवर असताना पेटवली तलाठ्याची गाडी

राज्यात राजकीय मंडळीवर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटना वाढल्या असून याची प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. दरम्यान यवतमाळमध्ये तहसीलदारांच्या घरासमोर उभी असलेली चारचाकी गाडी पेटवण्याची घटना घडली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे तहसीलदार यांच्या घरासमोर उभी असलेली एक चारचाकी अज्ञात इसमांनी जाळून भस्मसात केली आहे. सदर चारचाकी ही एका तलाठ्याची असल्याचे समोर आले आहे.

बुधवारी मध्यरात्री दोन अज्ञात इसमांनी कार पेटवून दिल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. सदर घटनेचे चित्तथरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

घाटंजी अंबा नगरी येथील तहसीलदार पूजा माटोडे यांच्या घरासमोर तीन चारचाकी उभ्या होत्या. त्यात पवन बोडें तलाठी यांच्या चारचाकी क्रं. MH 32 Y 0539 ह्या गाडीवर 2 व्यक्तींनी पेट्रोल‌ शिंपडून चारचाकी पेटवली.

घटनेवेळी तहसील टीम पेट्रोलींगवर होती. तहसीलदारानां‌ फोन द्वारे माहीती मिळताच टीम घटनास्थळी आली. मात्र गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेचे सी.सी.टी.व्ही. पडताळले असता दृश्यात दोन इसम गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवितानां दिसत आहे.

रात्री 11 वाजेच्या दरम्यान तहसीलदाराचे गाडी ड्रायव्हर गीरी यांना अज्ञात इसमाने मॅडमचे लोकेशन घेण्यासाठी फोन करून मँडम कोठे आहे असा प्रश्न्न विचारला. मी पत्रकार नखाते बोलतो असे बोलून फोन बंद केला.

यापूर्वी तहसील टीमवर अनेकदा रेती माफीयाचे हल्ले झालेले आहेत. बरीच चोरीची रेती व गाडी यापूर्वी जप्त करण्यात आलेली आहे. त्याचा सूड घेण्याचा हा प्रकार असल्याचे तलाटी बोडें यांनी सांगितले.

यावरून तहसीलची टीम किती सुरक्षित आहे. असा प्रश्न उपस्थित होतो. तहसील टीम जिवावर ऊदार होऊन अवैद्य रेती पकडण्यासाठी जीवाचे रान करुन रेती तस्करांचा पाठलाग करतात. मात्र रेती माफिया त्यांचा सूड ऊगविण्यासाठी असे हल्ले करुन मोकळे होतात. याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे.

Exit mobile version