Sat. Jun 12th, 2021

अमरावतीच्या प्राध्यापकांची किमया, कॉलेजमधील झाडं चक्क बोलू लागली

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरातील जे डी पाटील सांगळुदकर महाविद्यालयातील झाडं चक्क बोलू लागली आहेत. येथील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यपकांनी एक असं मोबाइल App बनवलं असून विशिष्ट झाडाजवळ जाताच ते झाड आपल्याशी बोलू लागतं आणि आपली संपूर्ण माहिती तुम्हाला देतं.

जे डी पाटिल सांगळुदकर महाविद्यालय दर्यापुर येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा सारंग धोटे , प्रा अनिल सोमवंशी , प्रा राहुल सावरकर आणि प्रा. चांदुरकर यांनी एक नवीन Mobile app develop केलं आहे. झाडांच्या 11 प्रजातींना QR कोड देत दोन भाषांत माहिती देणारं app तयार करण्यात आली आहेत. तसंच झाडांना विशिष्ट नंबर देऊन त्यांच्या प्रजातीविषयी माहिती हे App सांगतं.

विकासाच्या नावाखाली झाडांची होत असलेली कत्तल नक्कीच पर्यावर्णाचा मोठा ऱ्हास करत आहे. पावसाचा लहरीपणा, दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ, वाढते प्रदूषण यामुळे धोक्यात येणारे सामाजिक भविष्य सर्वांकरता धोक्याची घंटा आहे. झाडांच्या उपयुक्ततेविषयी आणि संवर्धनाविषयी असलेली अनास्था चिंतनीय आहे. म्हणून पर्यावरण संवर्धनाकरीता झाडं जगवणं काळाची गरज आहे.

मात्र आपल्या परिसरातील झाडांची माहितीच जर नसेल तर उपाय कसे करणार? झाड़ कधी बोलतच नाही अशी भावना मनात बाळगणाऱ्यांसाठी हे नवं Mobile App विकसित करण्यात आलं आहे.

या app मुळे झाडाजवळ जाताच ते झाड़ आता आपल्याशी चक्क बोलतं. झाड आपले गुणधर्म सांगू लागतं. झाडांच्या भवितव्याविषयी यामुळे नक्कीच जागरूकता निर्माण होईल. या app मुळे झाड आपल्याशी हितगुज करतं आणि आपल्यासोबत Selfie काढण्याची विनंतीही करतं.या अनोख्या app मुळे विद्यार्थ्यां  मोठं कुतुहल निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *