Sun. Aug 25th, 2019

पटेलांच्या पुतळ्यानंतर ‘या’ सुपरस्टारचा कट-आऊट ठरतोय सर्वांत उंच!

0Shares

भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. हा जगातला सर्वांत उंच पुतळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या पात्रात उभ्या केलेल्या या पुतळ्यानंतर आता चर्चा होतेय ती सर्वांत उंच कट-आऊटची…

 

तामिळ फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार विजय याचा सर्वांत उंच कट-आऊट त्याच्या केरळमधील फॅन क्लबतर्फे उभारण्यात आलाय. या कट-आऊटची उंची 175 फूट आहे. हा देशातला आत्तापर्यंतचा सर्वांत उंच कट-आऊट आहे. रजनीकांत यांच्यानंतर तामिळ चित्रपटसृष्टीत अभिनेता अजित कुमार आणि विजय या दोन अभिनेत्यांचं सर्वाधिक फॅन फॉलोइंग आहे. यातील थलपती विजयचा सरकार हा तामिळ सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विजय या सिनेमात प्रथमच मुख्य़मंत्र्यांची भूमिका साकारतोय. त्यामुळे विजयच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच त्याच्या काही उत्साही फॅन्सने आपल्या लाडक्या स्टारसाठी मोठं पाऊल उचललंय. आत्तापर्यंत देशात एवढ्या उंचीचा कट-आऊट कधीच उभारण्यात आला नव्हता. मल्याळम अभिनेता सनी वेयन याने विजयच्या या कट-आऊटचं अनावरण केलंय. केवळ कट-आऊट उभारूनच विजयचा फॅन क्लब थांबला नाहीय. तर त्यांनी सामाजिक कार्यासाठी 1 लाख रुपयांची देणगीही दिली आहे.

 thalapathy.jpg

दाक्षिणात्य फॅन्स आपल्या लाडक्या स्टार्सला देवापेक्षा कमी मानत नाहीत. सुपरस्टार रजनीकांत यांचे आत्तापर्यंत अनेकवेळा भव्य कटआऊट्स उभारले गेले आहेत. एवढंच नव्हे, तर त्या कटआऊट्सना दुधाचा अभिषेक केला गेलाय. मात्र आता रजनीकांत यांच्या कटआऊटलाही विजयच्या कटआऊटने मागे टाकलं आहे.   

 

थलपती विजय

अभिनेता जोसेफ विजय याला चाहत्यांनी थलपती अशी उपाधी दिली आहे.

रजनीकांत खालोखाल देशातील सर्वाधिक फॅन क्लब असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये विजयचा समावेश होतो.

विजयने लवकरच राजकारणात सहभागी व्हावे अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

सरकारया सिनेमात तो प्रथम मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहे.

सरकार हा विजयचा दिग्दर्शक ए. आर. मुरुगोदाससोबतचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी थुपुक्की (हिंदीत हा सिनेमा हॉलिडे नावाने प्रदर्शित झाला होता, ज्यात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती) आणि काथ्थीया दोन सिनेमांत त्यांनी काम केलंय. हे दोन्ही सिनेमे जबरदस्त हिट झाले होते.

 

हिंदी चित्रपट रावडी राठोडया सिनेमातील चिंताता चिता चिताया गाण्यामध्ये अक्षय कुमारसोबत विजयने स्पेशल अपिअरन्स केला होत. rowdyvijay-4.jpg

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *