Wed. May 12th, 2021

‘TikTok’ अॅपमुळे संस्कृतीचं पतन होतं, बंदी घालण्याची मागणी

ब्ल्यू व्हेल या जीवघेण्या गेमवर जशी बंदी आणली त्याप्रमाणेच ‘TikTok’ या व्हिडीओ अॅपवरही बंदी आणली जावी अशा स्वरुपाची मागणी तामिळनाडू सरकार लवकरच केंद्र सरकारकडे करणार आहे.

तामिळनाडूचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री एम. मणिकंदन यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली.

तमिळनाडू सरकार ‘TikTok’ या व्हिडीओ अॅपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

या अॅपमुळे तमिळ संस्कृतीचं पतन होत आहे, तसेच या ऍपमुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे.

या अॅपवर बंदी घालण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत.

ज्याप्रमाणे ब्ल्यू व्हेल या गेमवर बंदी आणली त्याप्रमाणे ‘TikTok’ या व्हिडीओ अॅपवरही बंदी आणली जावी अशी मागणी लवकरच केंद्र सरकारलाही करणार असल्याचे मणिकंदन यांनी म्हटले आहे.

Facebook, WhatsApp आणि Instagram या सोशल मीडिया अॅपनंतर आता सर्वांना TikTokचं वेड लागलं आहे.

लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येचं याचे क्रेझ पहायला मिळत आहे.

एखादे गाणे किंवा डायलॉगवर अभिनय करून तरुण मंडळी व्हिडीओ बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात.

या अॅपवर भन्नाट व्हिडिओ अपलोड करुन अनेकजण प्रसिद्धीच्या झोतातही आले आहेत, पण हे व्हिडीओ बनवण्यासाठी तरुण आपला जीव देखील धोक्यात घालत असल्याचे समोर आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *