Thu. Sep 19th, 2019

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तामिळनाडूत सात ठिकाणी एनआयएचा छापा

0Shares

एप्रिलमध्ये इस्टरडेला श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. ख्रिश्चन व पंचतारांकित हॉटेलमध्ये लागोपाठ 8 स्फोट झाले. या हल्ल्यात इस्टरनिमित्त प्रार्थनेसाठी चर्चमध्ये आलेल्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर या स्फोटातील सुत्रधार शोधण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूतील सात ठिकाणांवर छापा टाकला आहे.

तामिळनाडूतील सात ठिकाणांवर एनआयएचा छापा

श्रीलंकेत चर्च व पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते.

या प्रकरणात भारताचा काही संबंध आहे का हे पाहण्यासाठी एनआयएचे पथक श्रीलंकेत रवाना झाले आहे.

यानंतर या पथकाने कोईमतूर आणि अन्य भागांमधील सात ठिकाणांवर छापा टाकला आहे.

‘नॅशनल थौहीद जमाथ’या दहशतवादी संघटनेचा यामध्ये सहभाग असल्याचे समोर आलं आहे.

पार्श्वभूमीवर एनआयएने मंगळवारी तामिळनाडूत छापा टाकला आहे.

यातील मुख्य संशयित झहरान हाशमीचा फेसबुक फ्रेंड असल्याचे तपासातून समोर आले आहे.

त्यामुळे हे छापे टाकण्यात आला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *