Sun. Aug 25th, 2019

उद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल, पण त्यांनी निर्णय घ्यावा असं व्यक्तव्य जल संपदा मंत्री तानाजी सावंत यांनी पिंपरी चिंचवड मध्ये भूम परांडा वाशी पुणे रहिवाशी या मेळाव्यात केलं आहे.

0Shares

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल, पण त्यांनी निर्णय घ्यावा असं व्यक्तव्य जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी पिंपरी चिंचवड मध्ये भूम परांडा वाशी पुणे रहिवाशी या मेळाव्यात केलं आहे. भाजप- शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सरू आहे. अशी चर्चा सुरू असताना तानाची सावंत यांच्या वक्तव्याने या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

काय म्हणाले तानाची सावंत ?

2014 ला शिवसेना पक्षप्रमुखांना चक्रव्यूहात अडकवला होत,सत्तेचा माज मस्ती उतरविण्याची ताकद शिवबंधनात आहे.

नुसत्या धमक्या देऊ नका युती असेल तर सोबत नसेल तर मग आम्ही ही एकला चालोरे आमचं ही ठरलंय,

उस्मानाबादचे 6 ही आमदार आमचे असतील.मित्र पक्षाने आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये.

मराठवाड्याच पळवलेलं पाणी 2024 पर्यंत परत आणणार जाणता राजाने ही धमकी समजायची तर समजावी, पुढची 5 वर्ष हाच एक कलमी कार्यक्रम असेल, असा टोला शरद पवारांना दिला आहे.

राज्यातील बहुतेक धरणाचे ऑडीट झालंय, तिवरे धरण फुटल्यापासून आम्ही सावधानता बाळगत आहोत. असं ही ते म्हणाले आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *