Thu. Dec 2nd, 2021

भीषण दुष्काळ! पाण्याने भरलेल्या टॅंकरखाली येऊन 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

सध्या राज्यात पाणीबाणी सुरू असल्यामुळे लोकांना पाणी मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाशिक जिल्ह्यातही दुष्काळाचे सावट आहे. नाशिकच्या विरगाव येथे शेतीसाठी पाणी आणण्यासाठी गेलेला 11 वर्षीय मुलाचा टॅंकरखाली आल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिकच्या विरगावमध्ये 11 वर्षीय मुलाचा टॅंकरखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अक्षय गांगुर्डे असे मृत मुलाचे नाव आहे.

शेतीसाठी पाणी भरण्यासाठी टॅंकर घेऊन गेलेल्या अक्षय गांगुर्डेचा मृत्यू झाला.

ही घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास वटार येथे घडली आहे.

बागलाण तालुक्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे पाणी आणण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागतं आहे.

पाण्याने भरलेले टॅंकर परत येत असताना टॅंकरमधून अक्षयचा तोल गेल्याने तो खाली पडला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *