Fri. Jul 30th, 2021

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दयाबेन पुन्हा दिसणार?

तारक मेहता का उल्टा चश्मा हा कार्यक्रम गेल्या अमेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र काही महिन्यांपासून सगळ्यांची लाडकी आणि आवडती दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हे प्रेक्षकांना मालिकेत दिसत नाही आहे. तसेच तीच्या परतण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी ती पुन्हा मालिकेत झळकणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र या मालिकेचे निर्माते नवीन दयाबेनच्या शोधत असल्याचे समोर आले आहे.

मालिकेत नवीन दयाबेन येणार का ?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

या मालिकेचे नुकतेच 2700 भाग पूर्ण झाले आहेत.

मात्र सर्वांची लाडकी दयाबेन कित्येक महिन्यांपासून कार्यक्रमात दिसत नसल्यामुळे प्रेक्षक तिची आतुरतेने वाट बघत आहे.

दिशा वकानीने साकारलेली दयाबेन सगळ्यांच्या मनात घर बनवले आहे.

परंतू दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेत दिसत नाही आहे.

दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला.

दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती.

मात्र आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे.

आता प्रेक्षकांची लाडकी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

परंतू तसं न होता दयाबेन म्हणजेच दिशा वाकनी आता परत मालिकेमधे परतणार नसल्याची चर्चा सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *