Wed. May 22nd, 2019

तारापूरच्या एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत वायुगळती

0Shares

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी येथील एका केमिकल कंपनीत वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना ही वायुगळती झाल्याची माहिती समोर आली आहे. कामगारांची तपासणी करताना संबंधित डॉक्टरांनाही या वायूची लागण झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीच्या केमिकल कंपनीमधील रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाली.

या विषारी वायुगळतीमुळे तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

कामगारांना  औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र त्या रासायनिक वायुचा रुग्णालयातील इतरांनाही त्रास होऊ लागला.

तसेच कामागांरांच्या मृतदेहाची तपासणी करताना डॉक्टरांनाही त्रास होऊ लागला.

तसेच डॉक्टरांना सुद्धा अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *