Wed. Jan 19th, 2022

तासगाव-सांगली रोडवर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

सांगली : तासगाव सांगली रोडवर विचित्ररित्या भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला. गणेश पाटील आणि संकेत लिमये असे या अपघातातील मृताचं नाव आहे.

दोन टू व्हीलरमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. याच अपघाताच्या वेळेस मागून आलेल्या फोर व्हिलरने धडक दिली. या अपघातात दोन्ही बाईकचा चेंदामेंदा झाला आहे. तासगावच्या भगवती कोल्ड स्टोअरेज जवळ हा भीषण अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *