कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून महाराष्ट्रही सुटणार नाही

देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून महाराष्ट्रही त्यातून सुटणार नाही, असं टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे मृत्यू झाले तेवढे तिसऱ्या लाटेत होऊ नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करावी लागेल. तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते. त्यादृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची विस्तृत माहिती राज्य सरकारला दिल्याचे टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

तिसरी लाट येण्याच्या आधीच कोविड रुग्णालये, खाटा, तपासण्या आणि ऑक्सिजन यात मोठ्या प्रमाणावर वाढ करावी लागेल. बरे होणाऱ्या लोकांना कामावर जाताना ऑक्सिजनची गरज भासू शकते. त्यासाठी चौकाचौकांमध्ये ऑक्सिजन हब उभे करावे लागतील. तेथे जाऊन संबंधित काही वेळ ऑक्सिजन घेतील. तिसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची भीती आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याची उपचारपद्धती टास्क फोर्सने सुचविली आहे. त्यावर वेगाने काम सुरू झाले आहे, अशी माहिती डॉ. ओक यांनी दिली.

Exit mobile version