Mon. Jan 17th, 2022

आयपीएलमध्ये टाटा कंपनीची धमाकेदार एंट्री

पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये नवीन दोन संघांचा समावेश होणार आहे. त्याचसोबत आता आयपीएलमध्ये टाटा कंपनीची धमाकेदार एंट्री पाहण्यास मिळणार आहे.

आयपीएल २०२२मध्ये मोठे बदल घडणार आहेत. टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी ‘विवो’ने लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. आता पुढच्या वर्षापासून टाटा कंपनी आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर असणार असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकित हा निर्मय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ‘विवो आयपीएल’च्या ऐवजी ‘टाटा आयपीएल’ असे म्हणणे वावगे ठरू शकते. बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितल्यानुसार, आयपीएलच्या प्रायोजकत्वाचा करार सुरू ठेवण्यास तयार नाहीत. विवो आणि बीसीसीआय यांनी २०१८मध्ये आयपीएलसोबत टायटल स्पॉन्सरशिपसाठी ४४० कोटी रुपयांचा करार केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *