तौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहोचले

गुजरात: तौत्के चक्रीवादळ गुजरातसाठी गेल्या दोन दशकांतील सर्वात भयंकर वादळ ठरलं असून सोमवारी रात्री तौत्केनं गुजरातला धडक दिली. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी ६.३० मिनिटांनी या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू सौराष्ट्रात दीवपासून ९५ किमी उत्तर-पूर्वोत्तर आणि अमरेलीच्या दक्षिणेस १० किमी अंतरावर होता.

दीवमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी भारतीय लष्करही सज्ज आहे. लष्कराची सहा पथकं यासाठी तैनात करण्यात आले आहेत. तसंच जुनागडमधील भागात लष्कराच्या अतिरिक्त सहा तुकड्या सज्ज करण्यात आल्या आहेत. बोटाड, अमरेली तसंच गुजरातमध्ये वादळ धडकल्यानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसंच अनेक झाडं कोसळली आहेत.. या चक्रीवादळात अनेक घरांचंही मोठं नुकसान झालं आहे.

Exit mobile version