Wed. Jun 26th, 2019

‘इतकी’ कॅश काढल्यावर तुम्हाला भरावा लागणार कर

Indian new 2000 and 500 Rs Currency Note in isolated white background

0Shares

आता तुम्ही वर्षभरात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढली तर तुम्हाला सरकारला कर भरावे लागणार आहे. ब्लॅक मनीवर वचक बसवण्यासाठी आणि डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी हा नविन निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.

काय आहे ‘हा’ निर्णय ?

काळ्यापैशावर वचक बसावी आणि  डिजीटल व्यवहार वाढावा यासाठी  सरकारने आणखी एक नविन निर्णय घेतला आहे.

वर्षभरात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यावर सरकार आता कर लावणार असल्याची चर्चा सुरू आहे.

अधिक रक्कम काढल्यास आधार प्रमाणीकरण (Authentication) करणे गरजेचे असल्याचे प्रस्तावावरही सरकार  विचार करत आहे.

यामुळे व्यक्तीला ट्रॅक करणं आणि त्यांचे टॅक्‍स रिटर्न्‍स मिळवणं सोपं जाईल.

सरकार फक्त आधारकार्ड नंबरच घेणार नाही, तर गैरवापर टाळण्यासाठी OTPद्वारे खात्री ही केली जाणार आहे.

या सर्व प्रस्‍तावांवर 5 जुलैला चर्चा होणार असल्याचेही म्हटलं आहे.

मात्र यावर कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर सामन्या नागरिकांवर आणि गरिबांवर बोजा येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

NEFT आणि RTGS ट्रान्सफरवर बँक कुठल्याही प्रकारचा चार्ज घेणार नसल्याची घोषणा RBIने केली होती.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: