Fri. Aug 6th, 2021

धक्कादायक : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींसह पतीची आत्महत्या

चंद्रपूरमध्ये पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याने शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथम आपल्या दोन लहानग्या मुलींना गळफास लावून त्यांचे जीवन संपवले आणि गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. ऋषीकांत कदुपल्ली असे या शिक्षकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

ऋषीकांत कदुपल्ली हे चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये पत्नी आणि दोन मुलींसह राहत होता.

एका वाहनचालकासोबत  ऋषीकांत यांच्या पत्नीचे प्रेमप्रकरण जुळलेले होते.

आठवडाभरापूर्वी ऋषीकांत यांची पत्नी त्याच्या प्रियकरांसोबत पळून गेली.

या प्रकरणानंतर ऋषीकांत यांना याचा चांगलाच धक्का बसला.

ऋषीकांत  यांनी प्रथम आपल्या दोन लहानग्या मुलींना गळफास लावून त्यांचे जीवन संपवले.

मुलींना गळफास लावल्यानंतर ऋषीकांत यांनी त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्सअॅप केले.

हे फाटो पाहिल्यावर पत्नीला धक्का बसला तिने तातडीने वडिलांना कल्पना दिली.

ऋषीकांत यांच्या घरातून पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *