Wed. May 19th, 2021

10,001 जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात प्रदर्शित

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे.

ही जाहिरात पवित्र पोर्टलवर संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल.

2 मार्च 2019 रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे.

आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे.

विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील.

अशा सूचना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व संबंधित गटाशी विचारविनिमय केला असून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या.

या सर्व प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तींचे शिक्षक भरती प्रक्रिया यशस्वीपणे सुरु करण्यामध्ये योगदान आहे.

यापुढे देखील अशाच प्रकारे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असं सांगितलं आहे.

 

संपूर्ण महाराष्ट्रात इतक्या जागांसाठी शिक्षक शिक्षक भरती

 • महाराष्ट्र -10,001
 • अनुसूचित जाती- 1704
 • अनुसूचित जमाती- 2147
 • अनुसूचित जमाती (पेसा)- 525
 • व्हि.जे.ए.- 407
 • एन.टि.बी.- 240
 • एन.टी.सी- 240
 •  एन.टी.डी.- 119
 • इमाव- 1712
 • इ.डब्ल्यू.एस- 540
 •  एस.बी.सी.- 209
 • एस.ई.बी.सी.- 1154
 • सर्व साधारण- 924

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *