बिसलेरीच्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी

‘बिसलेरी कॅमल स्कूल’ या जाहिरातीत एका शिक्षकाला उंटांचा वर्ग घेताना दाखविण्यात आले आहे. त्यात उंटांनी चक्क शिक्षक किती अज्ञानी, हे दाखविले आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून शिक्षकांचा अपमान केल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यामुळे या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी शिक्षक वर्गातून करण्यात येत आहे.

भारताला अनेक महान शिक्षकांचा इतिहास आहे. त्यामुळेच शिक्षकाला राष्ट्रनिर्माते संबोधले जाते. परंतु बिसलेरीच्या जाहिरातीत शिक्षकांची प्रतिमा मलीन करण्यात आली आहे. या जाहिरातीत शिक्षक असूनही ‘कॉन्टॅक्ट लेस’ समजत नाही का? अक्राप्रकारे शिक्षकांची खिल्ली उडविण्यात आली आहे. जाहिरातीत शिक्षकाला निम्नस्तरीय, वाईट आणि खालच्या दर्जाची वागणूक दिली आहे. शिक्षकांचा अपमान करणाऱ्या बिसलेरी कंपनीला न्यायालयामार्फत धडा शिकवू, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

या जाहिरातीचा भाजप शिक्षक आघाडीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून, तात्काळ बंदी घालण्याची मागणी संघटनेच्या डॉ. कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके, अनिल शिवणकर, अजय भिडेकर, प्रदीप बिबटे, ओंकार श्रीखंडे, संदीप उरकुडे, रमेश बोरकर, कैलास कुरंजेकर,लीलेश्वर बोरकर, स्वरूप तारगे आदींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Exit mobile version