Thu. Dec 2nd, 2021

शिक्षक संघटनेच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटका!

महसूल कर्मचारी, ग्रामसेवक संपावर असल्याने आधीच गाव पातळीवर नागरिकांची अडचण होत आहे. त्यातच आज शिक्षक संघंटांनीही एकत्र येऊन संपामध्ये सहभागी होऊन विविध मागण्या संदर्भात शासनाचं लक्ष वेधलं.

गौरी पूजन, विसर्जन व रविवार अशा सलग तीन सुट्ट्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात.

खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून, कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावं.

केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावं.

अनुकंपा भरती तत्काळ करावी.

शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये.

शिक्षण व आरोग्यावर जीडीपीच्या टक्के खर्च करण्यात यावा.

या मागण्यांसंदर्भात शासनाला निवेदने दिली, मात्र, शासन पातळीवर त्याचा विचार झाला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव या संपात शिक्षकांना सहभागी व्हावं लागलं. पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील श्रीरामपूर परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाऱ्या गुणवंतराव देशमुख विद्यालयातील सर्व शिक्षकांनी संप पुकारुन आपला रोष व्यक्त केला. या संपाची कल्पना नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *