Wed. Jun 16th, 2021

धक्कादायक! शिक्षकांकडून वर्गात बलात्काराचं प्रात्यक्षिक, विद्यार्थिनी जखमी!

शाळेमध्ये एका विषय शिकवताना शक्य असल्यास प्रात्यक्षिक दाखवून तो विषय नीट समजावून सांगितला जातो. मात्र हैदराबाद येथे मात्र दोन शिक्षकांनी कहरच केला. त्यांनी चक्क विद्यार्थ्यांना बलात्काराचं प्रात्यक्षिक दाखवलं. या विरोधात जिल्हा शैक्षणिक मंडळाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘ती’ विद्यार्थिनी जखमी होण्याचं धक्कादायक कारण

सरकारी शाळेतील दोन शिक्षकांना पालकांनी मारहाण केल्याचं प्रकरण आधी समोर आलं.

मात्र यासंदर्भात चौकशी करताना आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

तीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती.

यामध्ये दोन विद्यार्थी होते आणि एक विद्यार्थिनी होती.

ही विद्यार्थिनी हाणामारीमध्ये जखमी झाल्याचं प्रथमतः वाटत होतं.

मात्र ती विद्यार्थिनी जखमी होण्याचं खरं कारण निराळंच होतं.

तिन्ही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली नव्हती, तर शिक्षकांनी बलात्कारासंबंधी शिक्षण देण्यासाठी या तीन विद्यार्थ्यांना निवडलं होतं.

त्यांच्याकडून बलात्काराचं प्रात्यक्षिक करवून घेतलं होतं.

या प्रात्यक्षिकामध्येच विद्यार्थिनी जखमी झाली होती.

या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात आता चौकशी सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांना बलात्कारासंबंधी माहिती देताना लहान मुलांकडून प्रात्यक्षिकं करून घ्यायची गरज काय होती, असा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *