Wed. Oct 27th, 2021

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर

आगामी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया टीम इंडियाच्या दौऱ्यावर येणार आहेत.

टीम इंडिया नववर्षात श्रीलंकेविरुद्ध टी-20 तर ऑस्ट्रे्लियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. दुखापतग्रस्त शिखर धवन आणि जस्प्रीत बुमराहचे टीम इंडियामध्ये कमबॅक झाले आहे.

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. ही 3 टी-20 मॅचची सीरिज असणार आहे. या टी-20 मालिकेला 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी या दोघांना श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मॅचचे वेळापत्रक

5 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v श्रीलंका, पहिली टी-20, गुवाहाटी

7 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v श्रीलंका, दुसरी टी-20, इंदूर

9 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v श्रीलंका, तिसरी टी-20, पुणे

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे मॅच खेळणार आहे. या वनडे सीरिजला 14 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या T-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दूबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जस्प्रीत बुमराह आणि वॉशिंगटन सुंदर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मॅचचे वेळापत्रक

14 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v ऑस्ट्रेलिया, पहिली वनडे, मुंबई

17 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v ऑस्ट्रेलिया, दूसरी वनडे, राजकोट

19 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v ऑस्ट्रेलिया, तिसरी वनडे, बंगळुरु

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दूबे, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रित बुमराह शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात टीम इंडिया 5 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *