Fri. Oct 7th, 2022

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्याची घोषणा करण्यात आली आहे.

आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया एकूण 3 वनडे मॅच खेळणार आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झालं आहे. तसेच गब्बर शिखर धवन यानेही कमबॅक केलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे धवनला सीरिजला मुकावे लागले होते.

टीममध्ये रोहित शर्माऐवजी मुंबईकर पृथ्वी शॉ़ याला संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे.

अवघ्या काही दिवसांआधी टीम इंडियाच्या निवड समितीपदी सुनील जोशी यांची नेमणूक करण्यात आली होती. जोशी यांची नेतृत्वाखाली टीम इंडियाची निवड करणअयाची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान टीम इंडियाच्या आधी दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी साऊथ आफ्रिकेची घोषणा

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिज

पहिली वनडे, १२ मार्च, धर्मशाळा

दुसरी वनडे, १५ मार्च, लखनऊ

तिसरी वनडे, १८ मार्च, कोलकाता

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.