Wed. Aug 10th, 2022

टीम इंडियाच्या जबरा फॅन असलेल्या ‘त्या’ आजीबाईंचे निधन

भारत देशात अनेक क्रिकेट फॅन आहेत. पण आठवणीत राहतील असे मोजकेच क्रिकेट चाहते असतात. अशाच टीम इंडियाला चिअरअप करणाऱ्या आजीबाईंचा मृत्यू झाला आहे.

टीम इंडियाच्या जबरा फॅन असलेल्या आजीबाई चारुलता पटेल यांचं सोमवारी निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या.

चारुलता पटेल यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन देण्यात आली आहे.

चारुलता पटेल यांचं मृत्यू झाल्याने बीसीसीआयने ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली दिली.

बीसीसीआयने ट्विट करताना कॅप्टन विराट कोहलीचा फोटो शेअर केला आहे.

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये  वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्ल्ड कपमधील टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्या सामन्यादरम्यान त्या उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित क्रिकेट रसिकांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं.   

तरुणांना लाजवेल अशा प्रकारे त्या टीम इंडियाला मैदानात सपोर्ट करत होत्या. मैदानात पिपेरी वाजवून त्या टीम इंडियाला चिअरअप करत होत्या.

या सामन्यादरम्यान त्यांची मुलाखत देखील घेण्यात आली होती.

बांगलादेश विरुद्धचा सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आजीबाईंची भेट घेतली होती.

टीम इंडिया की 'सुपरफैन दादी' का निधन, WC में सबको बनाया था मुरीद

या भेटीनंतर विराटने या आजीबाईंना काही सामन्यांचे तिकीटं दिली होती.

टीम इंडिया की 'सुपरफैन दादी' का निधन, WC में सबको बनाया था मुरीद

दरम्यान आजीबाईंच्या निधनामुळे अनेक क्रिकेटप्रेमींनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.