Wed. Oct 27th, 2021

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची क्रिकेटच्या तीनही प्रकारातून निवृत्ती

टीम इंडियाच्या खेळाडूने क्रिकेटच्या तीनही प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. टीम इंडियाच्या इरफान पठाणने क्रिकेटच्या तीनही प्रकारामधून निवृत्ती जाहीर केली आहे.

इरफान पठाण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेल्या ७ वर्षांपासून दूर होता.

इरफान पठाणने १२ डिसेंबर २००३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं. तर अखेरची टेस्ट पठाण २००८ साली खेळला होता.

ही टेस्ट इरफान पठाण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.

टेस्ट कारकिर्द

इरफान पठाण टेस्टमध्ये एकूण २९ सामने खेळला आहे. यामध्ये त्याने १०० विकेट घेतलेत. ५९ धावा देऊन ७ विकेट ही त्याची सर्वोत्त्कृष्ठ कामगिरी राहिली आहे. इरफान पठाणने टेस्टमध्ये ७ वेळा ५ विकेट तर २ वेळा १० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

इरफानने टेस्टमध्ये बॅटिंग करताना ११०५ धावा केल्या आहेत. त्याने १ शतक लगावले आहे.

वनडे कारकिर्द

इरफानने वनडेमध्ये ९ जून २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये पदार्पण केले होते.

इरफानने वनडेत एकूण १२० मॅच खेळल्या आहेत. यात त्याने १७३ विकेट घेतल्यात. तर वनडेत बॅटिंग करताना १५४४ धावा केल्या आहेत. ८३ ही इरफानची सर्वोच्च खेळी आहे.

आपल्या वनडे कारकिर्दीतील अखेरची मॅच इरफान श्रीलंकेविरुद्ध खेळला. ही मॅच ४ ऑगस्ट २०१२ साली खेळण्यात आली होती.

टी-२० कारकिर्द

झटपट म्हणजेच टी -२० मध्ये इरफानने २००६ ला पहिली मॅच खेळली होती. ही मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली गेली होती.

इरफानने टी-२० मध्ये अवघे २४ मॅच खेळला आहे. यात त्याने बॉलिगं करताना २८ विकेट घेतल्या आहेत. तर बॅटिंग करताना त्याने १७२ धावा केल्यात.

इरफान टी-२० कारकिर्दीतील अखेरची मॅच २ ऑक्टोबर २०१२ ला दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळला होता.

विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी

इरफानने २००६ साली टेस्टमध्ये हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. इरफानने ही हॅट्रिक कामगिरी पाकिस्तान विरुद्ध केली होती.

सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या तिघांना इरफानने आऊट केले होते.

तसेच २००७ च्या पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० फायनल मॅचचा इरफान पठाण सामानावीर ठरला होता.

टेस्टमध्ये इंडियाकडून ३ बॉलरने हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. यापैकी एक हा इरफान पठाण आहे.

टेस्टमध्ये इंडियाकडून हॅट्रिक घेणारा इरफान पठाण हा दुसरा बॉलर ठरला होता.

यााधी टीम इंडियाकडून टेस्टमध्ये २००१ साली पहिल्यांदा हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.

टीम इंडियाकडून आतापर्यंत टेस्टमध्ये ३ बॉलरनीच हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *