Wed. Jun 26th, 2019

टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज – विराट कोहली

0Shares

वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर आज टीम इंडियाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ह्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज असून, टीम इंडिया ही संतुलित आहे.आम्ही कोणत्याही संघाला कमकूवत न समजता प्रत्येक सामना हा महत्त्वाचा समजून खेळणार आहोत. या गोष्टी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज

टीम इंडिया World Cup २०१९ साठी सज्ज असून उद्या 22 मे रोजी टीम इंडिया इंग्लडकडे रवाना होणार आहे.

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे.

टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज असून, टीम इंडिया ही संतुलित आहे.

यावर्षी खेळावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे हे यावर्षीच्या विश्वचषकातील उद्देश आहे.

तसेच ह्या स्पर्धेत टीम इंडियाच्या गोलंदाजांची कामगिरी ही महत्त्वाची असून त्यासाठी टीम सज्ज आहे.

टीम इंडिया सामन्यागणिक आपला खेळ उंचावत नेण्याच्या प्रयत्नात असल्याचं रवी शास्त्रींनी स्पष्ट केलं आहे.

वर्ल्ड कपसाठी आज रात्री उशीरा टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: