Tue. Oct 19th, 2021

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये विराटला ‘हा’ रेकॉर्ड करण्याची संधी

टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. न्यूझीलंड दौऱ्याला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

२४ जानेवारीपासून ५ टी-२० मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.

या टी -२० सीरिजमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. टी-२० सीरिजमध्ये सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळवण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी विराटकडे आहे.

टी-२० सीरिजमध्ये आतापर्यंत विराट एकूण १२ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ राहिला आहे.

तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी देखील १२ वेळेस ‘मॅन ऑफ द मॅच’ राहिला आहे.

त्यामुळे आता विराटला न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये हा बहुमान मिळवण्याची संधी आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये विराटने मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवल्यास विराट टी-२०मध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच किताब मिळवणारा खेळाडू ठरेल.

टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर राहिलेल खेळाडू

मोहम्मद नबी – १२ सामनावीर पुरस्कार, ७५ मॅच

विराट कोहली – १२ सामनावीर पुरस्कार, ७८ मॅच

शाहिद आफरीदी – ११ सामनावीर पुरस्कार, ९९ मॅच

क्रिस गेल – ९ सामनावीर पुरस्कार, ५८ मॅच

शेन वॉटसन – ९ सामानावीर पुरस्कार, ५८ मॅच

दरम्यान न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० सामना खेळणार आहे. आतापर्यंत विराटने भारतात न्यूझीलंड विरुद्ध एकूण ५ टी-२० सामने खेळले आहे.

या ५ सामन्यात विराटने ४९.२५ च्या सरासरीने १९७ धावा केल्या आहेत. विराटची ७० ही सर्वाधिक धावसंख्या आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यांचे वेळापत्रक

२४ जानेवारी, पहिली टी-२०, ऑकलंड

२६ जानेवारी, दुसरी टी-२०, ऑकलंड

२९ जानेवारी, तिसरी टी-२०, हॅमिल्टन

३१ जानेवारी, चौथी टी-२०, वेलिंग्टन

२ फेब्रुवारी, पाचवी टी-२०, माउंट मोंगनूई

टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा , लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जस्प्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या : टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल, २४ जानेवारीपासून टी-२० सीरिज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *