Wed. Oct 27th, 2021

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिकेला उद्यापासून सुरुवात

चेन्नई : वेस्ट इंडिज विरुद्धची टी-20 सीरिज टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने जिंकली. यानंतर रविवार 15 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. विंडिज विरुद्धची पहिली वनडे उद्या चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाला विंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजआधीच दोन मोठे झटके लागले आहेत. टीम इंडियाचा गब्बर ओपनर शिखर धवन आणि बॉलर भुवनेश्वर कुमार या दोघांना दुखापत झाली आहे. त्यामुळे हे दोघे वनडे सीरिजमध्ये खेळणार नाही. या दोघांऐवजी टीममध्ये मयंक अगरवाल आणि मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

विंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेत मयंकला टॉप-11 मध्ये स्थान मिळाल्यास, मयंकची ही पहिलीच (डेब्यु) वनडे मॅच ठरेल.

सलामीवीर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्याने रोहित सोबत ओपनिंगसाठी कोणाला संधी मिळणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे. कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि शिवम दुबे हे खेळाडू चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या बॉलिंगची धुरा ही शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांच्यावर असेल.

विंडिज विरुद्धच्या वनडेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.

एकदिवसीय सामने

पहिली वनडे – 15 डिसेंबर 2019, चेन्नई

दुसरी वनडे – 18 डिसेंबर 2019, विशाखापट्टणम

तिसरी वनडे – 22 डिसेंबर 2019, कटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *