Tue. Oct 19th, 2021

INDvsAUS,Final : रविवारी बंगळुरुत रंगणार फायनलचा थरार

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना रविवारी १९ जानेवारीला खेळण्यात येणार आहे. बंगळुरुतील चिन्नस्वामी मैदानात ही मॅच खेळली जाणार आहे.

३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये दोन्ही टीमने प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे रविवारी होणारा अंतिम सामना हा चुरशीचा होणार आहे.

ऑस्ट्रेलियाने वानखेडे स्टेडिअमवर झालेला पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा १० विकेटने पराभव केला. तर राजकोटमधील दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली.

यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

यामुळे आता रविवारी होणारी फायनल मॅच चुरशीची होणार आहे.

टीम इंडियाची बंगळुरुतील कामगिरी

टीम इंडियाने 2001 सालापासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर 10 वनडे खेळल्या आहेत. यापैकी 6 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला.

तर 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या 2 ही मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला आहे.

दुखापतीचं ग्रहण

टीम इंडियाच्यामागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान शिखर धवनला दुखापत झाली होती. त्यामुळे धवनला फिल्डींगसाठी येता आले नाही.

धवन तिसऱ्या वनडेमध्ये खेळणार की नाही, याबद्दल अजूनही शाश्वती नाही.

दुखापतीमुळे धवनला तिसऱ्या वनडेला मुकावे लागले तर, हा टीम इंडियासाठी हा मोठा झटका असेल.

धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत ९६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.

दरम्यान टीम इंडियाचा रविवारी ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन मालिका जिंकण्याचा मानस असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *