Wed. Aug 10th, 2022

INDvsSA, 1st odi : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका भिडणार

न्यूजीलंड दौऱ्यावर टीम इंडियाला वनडे आणि टेस्टमध्ये मालिका पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात दक्षिण India vs SOuthAfrica odi series आफ्रिकेविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना आज १२ मार्चला हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे खेळण्यात येणार आहे.

दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे. वनडे सीरिजची सुरुवात विजयी होऊन करण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे.

दक्षिण अफ्रिका South Afriaca Tour India 2020 संघाने क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये 3-0 अशा फरकाने क्लीन स्वीप पराभव केला होता.

हिटमॅन रोहित सीरिजमधून बाहेर

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियाला हिटमॅन रोहितची उणीव भासणार आहे. रोहितला दुखापत झाली आहे.

रोहितला न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचदरम्यान दुखापत झाली होती.

रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन विराटच्या खांद्यावर बॅटिंगची जबाबदारी असणार आहे. विराटला न्यूझीलंडविरुद्ध फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती.

केएल राहुलवर जबाबदारी

लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी न्यूझीलंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. या दोघांकडे या वनडे सीरिजमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल या दोघांपैकी एकाला शिखर धवन सोबत ओपनरची भूमिका पार पाडवी लागणार आहे.

गब्बर धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्धात खेळल्या गेलेल्या वनडे सीरिजदरम्यान दुखापत झाली होती.

पांड्या आणि भुवनेश्वरचं कमबॅक

हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी बऱ्याच काळानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. हार्दिकने नुकतीच एका स्पर्धेत आक्रमक खेळी केली होती.

त्यामुळे या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

धर्मशाळेतील टीम इंडियाची कामगिरी

टीम इंडियाने आतापर्यंत धर्मशाळा येथे 4 वनडे मॅच खेळल्या आहेत. यामध्ये २ सामन्यात विजय तर २ सामन्यात पराभव झाला आहे.

धर्मशाळेतील खेळपट्टी ही वेगवान आहे. त्यामुळे मोठा आकडा बनण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

दक्षिण अफ्रिका गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर होती. त्यावेळेस टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा टेस्ट सीरीजमध्ये 3-0 असा पराभव केला होता. तर टी-२० सीरिज १-१ अशी बरोबरीत सुटली होती.

उभय संघाचा इतिहास

दक्षिण अफ्रिका संघाने १९९१ साली टीम इंडिया विरुद्ध पहिली वनडे मॅच खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत उभयसंघात एकूण ८४ वनडे सामने खेळण्यात आले आहेत.

यापैकी ४६ सामन्यात दक्षिण अफ्रिका टीमने टीम इंडियाचा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ३५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण ११ वनडे सीरिज खेळल्या गेल्या आहेत.

या ११ वनडे सीरिजपैकी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघानी प्रत्येकी ५ वेळा मालिका विजय मिळवला आहे. तर १ मालिका बरोबरीत सुटली आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी साऊथ आफ्रिकेची घोषणा

टीम इंडियाने खेळलेल्या मागील १० वनडेपैकी ८ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण अफ्रिकेने २ सामन्यात विजयश्री मिळवली आहे.

दरम्यान टीम इंडियाने पहिल्या सामन्याच्या आधी नेट्समध्ये कसून सराव केला आहे.

या सरावाचे फोटो बीसीसीआयने ट्विट केले आहेत.

टीम इंडिया : शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कॅप्टन), लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयष अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जस्प्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कॅप्टन), टेम्बा बवुमा, रासी वॅन डेर डूसेन, फॅफ डु प्लेसिस, काइल वेरिएने, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, जॉन-जॉन स्मटस, एंडिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपामला, ब्यूरेन हेंड्रिक्स, एनरिक नॉर्जे, जॉर्ज लिंडे आणि केशव महाराज

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.