Jaimaharashtra news

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका टी-२० सीरिज रविवारपासून

टीम श्रीलंका भारताच्या दौऱ्यावर येत आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका ( Team india vs sri lanka T-20 series) यांच्यात एकूण ३ मॅचची टी-२० सीरिज खेळली जाणार आहे.

या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिली टी-२० ५ जानेवारीला खेळण्यात येणार आहे.

या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.

ही मॅच गुवाहटीतील बारसपारा स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर

टीम इंडियाची नववर्षातील पहिलीच सीरिज असणार आहे.

विशेष म्हणजे टीम इंडिया १० वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 साली वर्षातील पहिली मॅच ५ जानेवारीला श्रीलंकेसोबतच खेळली होती.

श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सीरिजसाठी टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर श्रीलंकेच्या टीमची धुरा वेगवान बॉलर मलिंगाच्या खांद्यावर असणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे.

तर दुखापतग्रस्त शिखर धवन आणि जस्प्रीत बुमराहचे टीम इंडियामध्ये कमबॅक झाले आहे.

टीम इंडियामध्ये कमबॅक केलेल्या बुमराहने नेटमध्ये सराव केला. या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विट केला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या T-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दूबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जस्प्रीत बुमराह आणि वॉशिंगटन सुंदर

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मॅचचे वेळापत्रक

5 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v श्रीलंका, पहिली टी-20, गुवाहाटी

7 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v श्रीलंका, दुसरी टी-20, इंदूर

9 जानेवारी, 2020 : टीम इंडिया v श्रीलंका, तिसरी टी-20, पुणे

टी-20 सीरिजसाठी टीम श्रीलंका

केएल राहूल गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. श्रीलंके विरुद्धच्या सीरिजसाठी त्याने नेटमध्ये सराव केला आहे.

त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना लोकेश राहुलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

Exit mobile version