Mon. Aug 10th, 2020

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामना आज

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध होणारी तिसरी आणि अखेरची टी-20 मुंबईत होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर हा सामना खेळण्यात येणार आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

3 मॅचच्या सीरिजमध्ये दोन्ही टीमने प्रत्येकी 1-1 मॅच जिंकली आहे. त्यामुळे सीरिजच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वाची आहे.

टीम इंडियाने हैदराबादमध्ये झालेल्या पहिलेल्या टी-20 मध्ये विंडिजचा 6 विकेटने पराभव केला. तर विंडिजने दुसऱ्या टी-20 मध्ये इंडियाचा 8 विकेटने पराभव केला होता. त्यामुळे सीरिज जिंकण्याच्या उद्देशाने दोन्ही टीम आज मैदानात उतरतील.

टीम इंडियाचा वानखेडे स्टेडियमवरील याआधीचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. टीम इंडियाने या मैदानात खेळलेल्या 3 टी-20 पैकी 2 मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर विंडिजने या मैदानात खेळलेल्या 2 मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी गेल्या दोन टी-20 मॅचमध्ये ढिसाळ फिल्डिंग केली. त्यामुळे या अखेरच्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाकडून चांगल्या फिल्डिंगची अपेक्षा असणार आहे.

टीम विंडिज
कायरन पोलार्ड (कॅप्टन), फॅबियन एलन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल, ब्रॅण्डन किंग, एव्हिन लुईस, खैरी पियरे, निकोलस पूरन, दिनेश रामदिन, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विलियम्स, हेडन वॉल्श ज्युनियर

टीम इंडिया
विराट कोहली ( कॅप्टन ), रोहित शर्मा, संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *