Mon. Dec 6th, 2021

विडिंजविरुद्धच्या टी-२० सीरिजला आजपासून सुरुवात

हैदराबाद : विंडिज विरुद्धच्या टी-२० सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया आणि विडिंज ३ टी-२० मॅचच्या सीरिजमधील पहिली मॅच आज खेळणार आहे. ही मॅच हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. या मॅचला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.

पहिली मॅच ही मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार होती. परंतु पोलिसांनी सुरक्षा नाकारल्याने मुंबईतील नियोजीत सामना हैदराबाद येथे हलवण्यात आला.

टीम इंडियाचा कॅप्टन या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. विराट कोहलीला बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.

रोहित शर्मा एका रेकॉर्डपासून केवळ एक पाऊल दूर आहे. एक सिक्स लगावताच हा बहुमान रोहित शर्माला मिळणार आहे. क्रिकेटच्या तीन्ही फॉर्मेटमध्ये मिळून रोहितने आतापर्यंत ३९९ सिक्स ठोकले आहेत. ४०० सिक्ससाठी रोहितला केवळ १ सिक्सची गरज आहे. .

हा सिक्स मारताच रोहित ४०० सिक्स मारणारा टीम इंडियाचा पहिलाच बॅट्समन ठरेल. त्यामुळे रोहित शर्माकडून नेहमीप्रमाणे चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

टीम इंडियाच्या बॅटिंगची जबाबदारी रोहित सोबतच, विराट कोहली आणि मधल्या फळीतल्या खेळांडूवर असणार आहे. तसेच शिखर धवनला दुखापतीमुळे या सीरिजला मुकावे लागणार आहे.

धवन ऐवजी टीममध्ये लोकेश राहुलला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे रोहितसोबत राहुलला खेळण्याची संधी मिळू शकते.

बॉलिंगची जबाबदारी कुलचा जोडीवर (कुलदीप यादव-युजवेंद्र चहल) असेल. तर टीम इंडियात तब्बल दोन वर्षांनंतर मोहम्मद शमी कमबॅक करत आहे.

शमीने अखेरची टी-२० विंडीज विरुद्ध ९ जुलै २०१७ ला खेळला होता. तर भुवनेश्वर कुमारने देखील पुनरागमन केले आहे.

विंडीजची टीम टी-२० स्पेशालिस्ट मानली जाते. टीम इंडियापुढे विंडीजच्या बॅट्समनना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

वेस्ट इंडिज

किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऑलीन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लेविस, शेर्फानी रुदरफोर्ड, शिम्रॉन हेटमायर, खॉरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, कीमो पॉल, केसरिक विल्यम्स.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *