Tue. Oct 19th, 2021

NZvsIND, 3rd T20, हिटमॅन रोहितच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाचा ‘सुपर’ विजय

सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर टीम इंडियाचा ‘रोहिट’ विजय झाला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

न्यूझीलंडने टीम इंडियाला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी १८ धावांचे आव्हान दिले होते. याबदल्यात टीम इंडियाने  २० धावा केल्या.

सुपर ओव्हरच्या शेवटच्या २ बॉलवर सिक्स मारत टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे.

टीम इंडियाने या विजयासह ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १७९ धावाच केल्या. यामुळे सामना बरोबरीत सुटला.

न्यूझीलंडने १८० या विजयी धावांचे पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली.

न्यूझीलंडला पहिला झटका शार्दूल ठाकूरने दिला. त्याने मार्टिन गुप्टीलला ३१ धावांवर बाद केले. यानंतर लगेचच ५२ धावसंख्येवर रविंद्र जडेजाच्या बॉलिंगवर कॉलिन मुनरोला कीपर केएल राहुलने स्टंपिंग केलं.

न्यूझीलंडकडून सर्वाधिक ९५ धावा कॅप्टन केन विलियमसनने केल्या. टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर चहल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १-१ विकेट घेतला.

याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाची दमदार सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि केएल राहूल या दोघांनी धमाकेदार सुरुवात टीम इंडियाला मिळवून दिली.

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली.

केएल राहूलच्या रुपाने टीम इंडियाला झटका लागला. चांगल्या सुरुवात मिळाल्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावले.

टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ६५ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ फोर आणि ३ सिक्स लगावले. तर कॅप्टन विराटने ३८ रन्स केल्या.

न्यूझीलंडकडून हामिश बेनेटने ३ विकेट घेतल्या. तर मिशेल सेंटनर कॉलिन डी ग्रँडहोम या दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *