NZvsIND, 5th t20 : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 7 धावांनी विजय, न्यूझीलंडला व्हॉइटवॉश

टीम इंडियाने न्यूझीलंडवर ७ धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवला आहे. टीम इंडियाने ५ मॅचच्या टी-२० सीरिजमध्ये ५-० असं निर्विवाद यश मिळवलं आहे.
माउंट माउंगानुईमध्ये हा सामना खेळण्यात आला.
न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर तर टिम सेफर्टने ५० धावा केल्या.
टीम इंडियाने विजयासाठी किवींना १६४ धावांचे आव्हान दिले होते. या मोबदल्यात किवींना अवघ्या १५६ धावा करत्या आल्या.
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडला टीम इंडियाला सुरुवातीलाच झटके दिले. पहिले ३ विकेट १७ धावांवर गमावले.
मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये जस्प्रीत बुमराहने मार्टिल गुप्टीलला एलबीडबल्यू केलं.
यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये कॉलिन मुनरोला वॉशिंग्टन सुंदरने बोल्ड केले. टॉम ब्रूसच्या रुपात किवींना तिसरा झटका लागला.
टॉम ब्रूसला संजू सॅमसन आणि केएल राहूल या दोघांनी मिळून रनआऊट केले.
यानंतर रॉस टेलर आणि टिम सेफॅर्ट या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान किवींच्या या जोडीने शिवम दुबेच्या १ ओव्हरमध्ये ३४ धावा कुटल्या.
ही जोडी तोडायला नवदीप सैनीला यश आले.
यानंतर कोणत्याही खेळाडूला जास्त वेळ मैदनावर तग धरता आला नाही.
टीम इंडियाकडून जस्प्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट घेतले. तर शार्दूल ठाकुर आणि नवदीप सैनी या दोघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. संजू सॅमसनच्या रुपाने टीम इंडियाला ८ धावा असताना पहिला झटका लागला.
यानंतर आलेल्या रोहित शर्माने केएल राहुलच्या सोबतीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्वपुर्ण भागीदारी केली.
९६ धावसंख्या असताना टीम इंडियाला दुसरा धक्का लागला. सातत्याने चांगली कामगिरी करणारा केएल राहूल ४५ धावा करुन आऊट झाला.
राहुलने आपल्या खेळीत ४ फोर आणि २ सिक्स लगावले.
टीम इंडियाकडून सर्वाधिक ६० धावा कॅप्टन रोहित शर्माने केल्या.
रोहित शर्माला दुखापत झाल्याने तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे रोहितला ड्रेसिंग रुममध्ये परतावे लागले.
याखालोखाल लोकेश राहुलने ४५ तर श्रेयस अय्यर ३३ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून स्कॉट कुग्गेलॅनने २ तर हामिश बेनेटने १ विकेट घेतला.
भारतीय टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (विकेटकीपर), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड टीम: टिम साउदी (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, कोलिन मुनरो, टॉम ब्रूस, रॉस टेलर, टिम सीफर्ट (विकेटकीपर), मिशेल सेंटनर, स्कॉट कुग्गेलॅनईश सोढ़ी, हामिश बेनेट, डेरिल मिशेल.