Sat. Sep 21st, 2019

टीम इंडियाचा दणदणीत विजय; विंडीजवर 318 धावांनी केली मात

0Shares

अँटिग्वा स्पर्धेत टीम इंडियाने यजमान विंडीजला तब्बल 318 धावांनी पराभूत केले आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाला विंडीजला पराभव करण्यात यश मिळाले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर दुसऱ्या इनिंगमध्ये विंडीजचा धुव्वा उडाला. बुमराहला इशांत आणि शामीचीही चांगली साथ लाभली.

टीम इंडियाचा दणदणीत विजय –

अँटिग्वा स्पर्धेत टीम इंडियाचा दणदणीत विजय मिळवला आहे.

टीम इंडियाने तब्बल 318 धावांनी पराभूत केले आहे.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने १०२ धावांनी आणि हनुमा विहिरीच्या ९३ धावांची खेळी केली.

त्याचबरोबर जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे दुसऱ्या इनिंगमध्ये विंडीजचा धुव्वा उडाला.

जसप्रीत बुमराहने 5, इशांत शर्माने 3, तर शामीने 2 विकेट्स घेत विंडीजची 100 धावावरंच दाणादाण उडवली.

दोन्ही इनिंगमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.

टीम इंडियाचा परदेशातील हा सर्वात मोठा विजय आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *