Tue. Jun 15th, 2021

T-20 मालिका टीम इंडियाच्या खिशात, कोहलीचा ‘विराट’ विक्रम

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरोधातील T-२० मालिका खिशात घालून 2020 वर्षाची विजयी सुरुवात केली आहे. लोकेश राहुल आणि शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांनी (Opening Batsman) धमाकेदार सुरुवात केली. दोघांच्याही  अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाचा विजय निश्चित झाला.

तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 78 धावांनी हरवलं.

ही मॅच जिंकून टीम इंडियाने संपूर्ण मालिकाच जिंकली.

3 सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

तिसऱ्या सामन्यात Team India ने प्रथम फलंदाजी घेत 6 बाद 201 असा धावांचा डोंगर रचला.

श्रीलंकेला टीम इंडियाचं आव्हान पेलवलं नाही. अवघ्या 123 धावांत श्रीलंकेचा खेळ आटोपला.

या सामन्यातून कॅप्टन विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे.

196 डाव खेळून त्याने 11 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वांत कमी डावांत 11 हजार धावांचा टप्पा पार करून विराट कोहली 11 हजार धावा पूर्ण करणाऱ्या कॅप्टन्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हा विक्रम करण्यासाठी त्याला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात केवळ 1 धाव पुरेशी ठरली.

11 हजार धावांचा टप्पा ओलांडणारे कॅप्टन्स-

विराट कोहली – भारत -196 डाव

रिकी पाँटिंग – ऑस्ट्रेलिया – 265 डाव

अॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलिया – 316 डाव

महेंद्रसिंह धोनी – ऑस्ट्रेलिया – 324 डाव

स्टिफन फ्लेमिंग – न्यूझीलंड – 333 डाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *