Fri. Jan 21st, 2022

INDvsWI, Final : टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यातील अंतिम सामना आज कटक येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

3 सामन्यांच्या मालिकेत विंडिज आणि टीम इंडियाने प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आजची शेवटची मॅच निर्णायक ठरणार आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची असणार आहे.

कटकवरील टीम इंडियाचा इतिहास

टीम इंडियाने कटकमध्ये आतापर्यंत एकूण 16 वनडे खेळल्या आहेत. यापैकी टीम इंडियाचा 12 वनडेत विजय झाला आहे.

तर 4 सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे या मैदानावरील टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे.

टीम इंडियाने या मैदानावरील विंडिजविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही.

अंतिम सामना असल्यामुळे दोन्ही टीमवर दबाव असणार आहे. टीम इंडियाने गेल्या 15 वर्षात मायदेशात एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही.

त्यामुळे ही मालिका जिंकत विजयी परंपरा कायम ठेवण्याची मानस असेल. तर विंडिजही विजयासाठी प्रयत्न करतील.

नवदीप सैनीने टीम इंडियामध्ये (debut) पदार्पण केले आहे. दीपक चहरने दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्याआधीच दुखापतग्रस्त झाला. त

त्यामुळे दीपक चहरच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आलं आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर ), केदार जाधव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी

टीम विंडिज : इव्हिन लुईस, शाय होप (विकेटकीपर ), शिमरॉन हेटमायर, रोस्टन चेस, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड (कॅप्टन), जेसन होल्डर, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, खॅरी पिएर, शेल्डन कॉट्रेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *