Fri. Jan 21st, 2022

सलमानच्या बहुप्रतिक्षित ‘Bharat’ सिनेमाचा Teaser रिलीज

बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘भारत’ या सिनेमा पहिला Teaser आज प्रदर्शित झाला आहे.  सलमानने आपल्या Twitter वरुन या सिनेमाचा Teaser शेअर केला आहे. यामध्ये सलमान वेगवेगळ्या Looksमध्ये असल्याचे पहायला मिळत आहे.

अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत सिनेमात सलमानसोबत ‘Katrina Kaif’ही झळकणार आहे. याआधी अली अब्बास जफर यांच्या ‘Tiger Zinda Hai’ सिनेमामध्ये सलमान आणि Katrinaयांनी एकत्र काम केले होते.

2 महिन्यांपूर्वी ‘भारत’ सिनेमाचा पहिला Poster प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये वाघा बॉर्डरवर भारतातून सलमान आणि Katrina पाकिस्तानकडे पाहत उभे आहेत. वाघा बॉर्डरवर चित्रीकरणाची परवानगी दिली नसल्याने सिनेमाचे सेट पंजाबमधील लुधियाना येथे उभारण्यात आले होते.

2014मध्ये प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन सिनेमावर ‘भारत’ आधारलेला आहे. या सिनेमात रशियन सर्कस आणि अन्य साहसी दृश्य पाहायला मिळतील.

यावर्षी ईदच्या दिवशी ‘भारत’ हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *