आयफोन SE 4: कॉम्पॅक्ट डिझाइन आणि 48 MP कॅमेरा, फक्त ₹43,490
अॅपल कंपनी 19 फेब्रुवारी रोजी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन आयफोन एसई 4 असण्याची शक्यता आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे या लाँच इव्हेंटची माहिती शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिल्वर रंगाचा अॅपल लोगो दिसत आहे. 'कुटुंबातील नवीन सदस्याला भेटण्यासाठी तयार व्हा' असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. जरी फोनचे नाव उघड केलेले नसले, तरी हा नवीन सदस्य आयफोन एसई 4 असू शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.
अॅपल यावेळी आयफोन एसई 4 व्यतिरिक्त पॉवरबीट्स प्रो 2 इयरबड्स, एम4 मॅकबुक एअर, एम3 आयपॅड एअर आणि 11व्या पिढीचे आयपॅड देखील लाँच करण्याची शक्यता आहे. हा आयफोन अॅपलचा सर्वात स्वस्त फोन असेल. त्याची किंमत $499 (भारतीय चलनात सुमारे ₹43,490) असल्याचे सांगितले जात आहे. आयफोन 15 पेक्षा कमी किंमतीत हा फोन उपलब्ध होईल.
आयफोन SE 4 मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणार आहे. हा फोन बायोनिक A18 प्रोसेसरसह येऊ शकतो, जो आयफोन 16 मालिकेत देखील वापरला जाणार आहे. हा प्रोसेसर फोनला जलद आणि सहज कामगिरीसाठी सक्षम बनवेल. आयफोन 16 प्रमाणे, या फोनमध्येही 8 जीबी रॅम असू शकते आणि अॅपल इंटेलिजेंस तंत्रज्ञानासह हा फोन सादर केला जाईल.
या नवीन आयफोनमध्ये 6.1-इंचाचा OLED पॅनेलवर आधारित सुपर रेटिना XDR डिस्प्ले असू शकतो, जो 460ppi पिक्सेल डेन्सिटीला सपोर्ट करेल. हा कॉम्पॅक्ट स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी 48 एमपीचा सिंगल कॅमेरा घेऊन येईल, जो मागील पॅनलवर फ्लॅश लाईटसह बसवलेला असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 एमपीचा फ्रंट कॅमेरा देखील असणार आहे.
टेकप्रेमींसाठी हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अत्याधुनिक फीचर्स, कमी किंमत आणि विश्वासार्ह ब्रँडमुळे आयफोन SE 4 वर ग्राहकांची मोठी पसंती मिळण्याची शक्यता आहे.